Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रवैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांवर काळाचा घाला

वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांवर काळाचा घाला

वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. एक मिनी बस आणि ट्रकची धडक झाली. अपघात इतका भयानक होता की, सात जणांचा मृत्यू झाला. 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. दिल्ली- जम्मू नॅशनल हायवे वर हरियाणा अंबाला येथे हा भीषण अपघात झाला.

अपघाताच्यावेळी किंचाळण्याचा मोठा आवाज झाला. ते ऐकून स्थानिक नागरिक मिनी बसमधील नागरिकांच्या मदतीसाठी धावले. जखमी झाल्यामुळे लोक वेदनेने कण्हत होते. स्थानिक लोकांनी कसं-बसं जखमी प्रवाशांना बस बाहेर काढलं. पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.

पोलिसांची टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रक चालक फरार आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही मिनी बस हरियाणाहून अंबाला मार्गे वैष्णो देवी मंदिराकडे चालली होती. बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. बस दिल्ली-जम्मू नॅशनल हायवे वर आल्यानंतर पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा मृत्यू झाला. आज 24 मे च्या सकाळी हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते अपघातात मिनी बसच पूर्ण नुकसान झालय

 

‘ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत होता’

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून ही बस वैष्णो देवीला चाललेली असं अपघातातील एका जखमीने सांगितलं. बस दिल्ली-जम्मू हायवे वर असताना बसच्या पुढे एक ट्रक होता. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मिनी बस ट्रकला मागून जोरात धडकली. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचचा ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत होता. सध्या ड्रायव्हर फरार आहे.

 

ओव्हर स्पीडच प्रकरण का?

 

मिनी बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. रस्त्यावर काचा पडल्या आहेत. घटनास्थळी गोंधळ, भीतीच वातावरण होतं. अपघात कसा झाला? त्याचा तपास होईल असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. ओव्हर स्पीडच प्रकरण असू शकतं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली जात आहे. मृतांच्या कुटुंबियांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -