हार्दिक पांड्या याचे मुंबई एक अपार्टमेंट आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, त्याची किंमत 30 कोटी रुपये आहे. तसेच त्याचे बडोद्यामध्ये एक पेन्ट हाऊस आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. परंतु घटस्फोट झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलू शकते.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार झाली. हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. त्यानंतर आता हार्दिक टी-20 ची विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात अधिकृत भूमिका दोघांकडून जाहीर झालेली नाही. परंतु घटोस्फोट झाल्यावर संपत्तीचा 70 टक्के वाटा नताशा घेऊन जाणार आहे.
नताशाने नाव काढले अन् सुरु झाली चर्चा
पांड्या आणि नताशा अनेक दिवसांपासून सोबत दिसत नाही. दोघांनी सोशल मीडियावर शेवटचा फोटो 14 फेब्रुवारी रोजी शेअर केला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात दोघे दिसले होते. त्यानंतर नताशा स्टेनकोविक हिच्या नावापुढे इंस्टाग्रामवर पांड्या आडनाव होते. ते नावही नताशाने काढले. तसेच आयपीएलमध्ये हार्दिकच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी नताशा कधी आली नाही. त्यानंतर दोघांमधील वाद टोकाला पोहचल्याची अफवा सुरु झाली. आता दोघांचा घटस्फोट झाल्यावर हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के भाग नताशाकडे जाणार आहे. हार्दिक पांड्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आयपीएलमधून मिळणारे मानधन, बीसीसीआयकडून मिळणारी रक्कम आणि जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्नातून हार्दिक पांड्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे.
हार्दिक पांड्याची कामाई किती
हार्दिक पांड्या आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याला मुंबई इंडियन्सकडून मानधन म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. त्यापूर्वी हार्दिक गुजरात टायटन्सकडून खेळत होता. गुजरात टायटन्सकडून त्याला इतकीच रक्कम मिळत होती. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याला मानधन मिळत असते. अनेक कंपन्यांचा तो ब्रँड एंबेसडर आहे. त्यातूनही त्याला चांगले उत्पन्न मिळते. दोघांच्या घटस्फोटासंदर्भात अनेक टि्वट व्हायरल झाले आहेत.
मुंबई, बडोद्यात कोट्यवधींचे घर
हार्दिक पांड्या याचे मुंबई एक अपार्टमेंट आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, त्याची किंमत 30 कोटी रुपये आहे. तसेच त्याचे बडोद्यामध्ये एक पेन्ट हाऊस आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. परंतु घटस्फोट झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलू शकते.