धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकली मार्केट येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन आमदार प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते आणि सुहास जांभळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हाध्यक्ष राजू पुजारी, प्रकाश पुजारी, डॉ. ईश्वर यमगर, राष्ट्रवादी उपाध्यक्ष शिवाजी शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आले.
याप्रसंगी सुनिल आरगे, अरविंद पुजारी, हरीष सुर्वे, सतिश यड्रावे, प्रदीप खोत, प्रणव पुजारी, लक्ष्मण हेरवाडे, सतिश कारदगे, जयवंत ताटे, रवि मद्यापगोळ, रामचंद्र बत्ते, शंकर पुजारी, प्रदीप पुजारी, रणजित अनुसे, नागेश पुजारी, बद्री खोत, अशोक पुजारी, अमीत पुजारी, सचिन मासाळ, बाळासो बरगाले, अनिल पुजारी, सोन्या पुजारी, राजेश आरगे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता धुले, विद्या लवटे, प्रियदर्शिनी बेडगे, राजश्री शिंदे, शुभांगी पुजारी आदिसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.