Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीथोरल्या पवारांनी धाकट्या पवारांसह भाजपला केलं चारीमुंड्या चीत

थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांसह भाजपला केलं चारीमुंड्या चीत

बारमतीबद्दलचा संभ्रम महायुतीच्या नेत्यांना चांगलाच महागात पडला. चंद्रकांत पाटील हे आमदारांच्या संख्येने बारामतीचं गणित मांडत होते. देवेंद्र फडणवीस स्टेजवरील नेत्यांच्या संख्येवरून मतदानाची आकडेमोड करत होते. पण नेते सोबत आले तरी जनता सोबत येते हा समज बारामतीनं खोटा ठरवला

 

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. बारामतीमध्ये नणंद-भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय झालाय. कागदावरच्या गणिताने आणि स्टेजवरच्या नेत्यांच्या गोळाबेरजेने राजकारण साधता येतं. हा बारमतीबद्दलचा संभ्रम महायुतीच्या नेत्यांना चांगलाच महागात पडला. चंद्रकांत पाटील हे आमदारांच्या संख्येने बारामतीचं गणित मांडत होते. देवेंद्र फडणवीस स्टेजवरील नेत्यांच्या संख्येवरून मतदानाची आकडेमोड करत होते. पण नेते सोबत आले तरी जनता सोबत येते हा समज बारामतीनं खोटा ठरवला आणि जिथं महायुतीने संपूर्ण शक्ती लावून जंग जंग पछाडलं तिथेच थोरल्या पवारांनी धाकड्या पवारांसह भाजपला चारीमुंड्या चित केलं. अजित पवारांनी ९० टक्के पक्ष फोडून काकांविरूद्धच उभा दावा मांडला. दिग्गजांनी साथ सोडली त्यावेळी शरद पवारांकडे चेहरा कोण? याचंउत्तर निकालानंतर शरद पवारांनी दिलेलं खरं ठरलं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -