अनेक लोक हे भविष्यासाठी काही नवीन गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु गुंतवणूक करताना आपले पैसे सुरक्षित आहेत का आणि त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
सध्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन स्कीम उपलब्ध आहेत. परंतु पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. यातील अनेक योजनेचा फायदा नागरिकांनी घेतलेला आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या पाच वर्षासाठी आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक देखील गुंतवणूक करत असतात. यातील पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करून सुमारे 4. 50 हजार रुपये केवळ व्याज मिळू शकता.
सरकारने देशातील सर्व घटकांसाठी ही योजना (Post Office Scheme) राबवली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ होईल यादृष्टीने या योजना आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही एक छोटी बचत योजना आहे. या योजनेमध्ये नागरिक पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याज मिळते. त्याचप्रमाणे कलम 80c अंतर्गत 1. 50 लाख रुपयांपर्यंत कर सूट देखील मिळते.
सरकारच्या या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये संपूर्ण पैसे एकाच वेळी जमा करावे लागतात. व्याज वेळोवेळी जोडले जाते. याला पोस्ट ऑफिस एफडी योजना असे देखील म्हणतात ही टाईम डिपॉझिट योजना चार वेगवेगळ्या प्रकारच्या कालावधीसाठी व्याज देते. आता या योजनेची आपण माहिती जाणून घेऊया.
कोणत्या कालावधीवर किती व्याज दिले जाईल? | Post Office Scheme
1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.9% दराने व्याज उपलब्ध आहे.
2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.0% दराने व्याज उपलब्ध आहे.
3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.1% दराने व्याज उपलब्ध आहे.
5 वर्षांसाठी 7.5% व्याज उपलब्ध आहे.
एक किंवा तीन लोक खाते उघडू शकतात
पोस्ट ऑफिस TD अंतर्गत, 3 लोक एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकतात. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवलेल्या कमाल रकमेवर मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत, आयकर कलम 80C अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट दिली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही सहा महिन्यांपूर्वी पैसे काढू शकत नाही.
व्याजातून 4.5 लाख रुपये मिळतील
या योजनेंतर्गत तुम्ही दररोज 2,778 रुपये वाचवल्यास आणि एका वर्षानंतर किमान 10 लाख रुपये एकत्र गुंतवल्यास, तुम्हाला 5 वर्षांमध्ये केवळ व्याजातून 4,49,948 रुपये मिळतील. पाच वर्षांत एकूण रक्कम 14,49,948 रुपये असेल.