आयसीसीने स्वतः न्यूयॉर्कमधील या स्टेडियमवर 250 कोटी रुपये खर्चून करुन खेळपट्टी बनवली आहे. परंतु हे तात्पुरते स्टेडियम आहे. वर्ल्डकप नंतर ते क्रिकेट स्टेडियम राहणार नाही. त्यामुळे या स्टेडियमसाठी चार ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरण्यात आल्या आहेत.
टी-20 वर्ल्ड कप 2024 अमेरिकेत सुरु आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने दोन सामने जिंकत दमदार वाटचाल सुरु केली आहे. न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर टी-20 सारखी धावसंख्या उभारली जात नाही. वेगवान खेळण्यास सुरुवात केल्यानंतर बाद होणे निश्चित आहे. त्या ठिकाणी धावफलक हालता ठेवला तर संघाच्या धावसंख्येला आकार येत आहे. आता न्यूयॉर्कमधील नसाउ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या ठिकाणी फलंदाज नाही तर बॅट फेल होत आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांच्या बॅटा तुटत आहेत. त्याचा व्हिडिओ आयसीसीनेच शेअर केला आहे.
या दोन खेळाडूंच्या बॅटा तुटल्या
न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या सामन्यात दोन फलंदाजांच्या बॅटा तुटल्या. बांगलादेशचा खेळाडू जॅकर अली याची बॅट हँडलपासून तुटली तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद रिजवान याची बॅट बॉटमपासून तुटली. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शेअर केला आहे.
का तुटतात बॅटा
न्यूयॉर्कमधील खेळपट्टीमुळे बॅटा तुटत आहे. ही खेळपट्टी खूपच खराब आहे. या खेळपट्टीवर बॉल खूप खाली राहते किंवा वर राहते. अनेक वेळ थांबून बॉल येतो. त्यावेळी फलंदाजाने जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केल्यास बॉट तुटते.
चार ड्रॉप-इन खेळपट्ट्या
आयसीसीने स्वतः न्यूयॉर्कमधील या स्टेडियमवर 250 कोटी रुपये खर्चून करुन खेळपट्टी बनवली आहे. परंतु हे तात्पुरते स्टेडियम आहे. वर्ल्डकप नंतर ते क्रिकेट स्टेडियम राहणार नाही. त्यामुळे या स्टेडियमसाठी चार ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरण्यात आल्या आहेत. त्या खेळपट्या ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड येथे तयार करुन आणण्यात आल्या आहेत. या खेळपट्टीवरील सराव सामने वगळता संघाला कधीही 140 चा टप्पा पार करता आलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने 110 हून अधिक धावा करून सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत हे स्टेडियम आणि त्याच्या खेळपट्ट्यांबाबत चर्चा सुरू आहे, मात्र आयसीसीने यावर आतापर्यंत मौन बाळगले आहे.