तूम्ही जर बारावी पास किंवा पदवीधर असाल तर सरकारी नोकरी करण्याची तुम्हाला संधी आहे. पशुसंवर्धन विभागात दोन पदांसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. केंद्र शासनाची राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM-National Livestock Mission) या योजनेअंतर्गत व पशुसंवर्धन विभागाने कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर या दोन पदांसाठी सूचना काढली आहे.
कोणत्या पदांसाठी आहे संधी?
व्हेटर्नरी ग्रॅज्यूएट – ५६००० प्रतिमाह
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी, पदव्यूत्तर पदवी
एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
शासकीय सेवेतील अथवा शासन अंगीकृत उपक्रम, योजना, प्रकल्प इ मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास किंवा सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य
डाटा एन्ट्री ऑपरेटर- २०००० प्रतिमाह
किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य
एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
डाटा एंट्री ऑपरेटर पदावर किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव, शासकीय विभाग, उपक्रम, योजना, प्रकल्प इ काम केलेले असल्यास प्राधान्य
अर्जाची अंतिम तारीख
या पदांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २० जून २०२४ असून या पदांच्या अधिक तपशील, अर्ज, निवड पद्धती, अटी शर्ती, कामाचे स्वरूप इ बाबत पशुसंवर्धन विभागाच्या www.ahd.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.