Sunday, December 22, 2024
Homeनोकरी46 हजार पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, जाणून घ्या..

46 हजार पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, जाणून घ्या..

अनेकांचे सरकारी नोकरी करण्याची स्वप्न असते. आता सरकारी नोकरी करण्याची तुमचेही स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल.

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून GD कॉन्स्टेबल भरती 2024 राबवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 46,617 पदे ही भरली जातील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), सशस्त्र सीमा दल (SSF), आणि आसाम रायफल्समध्ये नोकरी करण्याची संधी आहे. महिलांसाठी देखील काही पदे ही राखीव ठेवण्यात आली आहेत.

 

https://ssc.nic.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. https://ssc.gov.in/api/attachment/uploads/masterData/NoticeBoards/Revised%20Vacancies_CT-GD-2024_as%20on_13.06.2024.pdf या लिंकवर आपल्याला संपूर्ण यादी ही वाचायला मिळेल.

 

दुसरीकडे AIESL कडून देखील भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे टेक्निशियन आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियनचीपदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागतील. 100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. वयाची आणि शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये.

 

AIESL कडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील. http://AIESL.aisl.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील आणि तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -