Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी:सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्या: ताराराणी विद्यार्थी आघाडी

इचलकरंजी:सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्या: ताराराणी विद्यार्थी आघाडी

इचलकरंजी

इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासह सर्वांना प्रवेश मिळावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील विविध महाविद्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, शहराध्यक्ष फहिम पाथरवट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोविंदराव कॉलेज, श्री व्यंकटेश महाविद्यालय, दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, कन्या महाविद्यालय आणि इतर सर्वच महाविद्यालयातील प्राचार्यांना भेटून वरील मागणीचे निवेदन दिले.

यावेळी ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतिश मुळीक, कार्याध्यक्ष तात्यासो कुंभोजे, माजी नगरसेवक राजु बोंद्रे, भारत बोंगार्डे, नितेश पोवार, ताराराणी युवा आघाडी खजिनदार अक्षय बरगे, शहर उपाध्यक्ष निखील लवटे, उपाध्यक्ष सागर कम्मे, यश शेटके आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -