Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांत विद्यार्थी संख्या वाढली 

इचलकरंजी : महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांत विद्यार्थी संख्या वाढली 

शैक्षणिक नवीन वर्षामध्ये महानगरपालिकांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली मध्ये ७४० इतके तर दुसरी ते आठवीच्या वर्गांमध्ये खाजगी शाळामधून पहिलीसाठी १९७ इतके विद्यार्थी दाखल झाले ७४० विद्यार्थी नोंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये मनपा

शाळांमध्ये ७२६० विद्यार्थी शिक्षण घेत होते.

यावर्षी यामध्ये वाढ होऊन ती विद्यार्थी संख्या ७४४३ इतकी झाली आहे. शासन नियमानुसार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शाळेमध्ये विद्यार्थी दाखल होत असतात. त्यामुळे महानगरपालिका शाळांमध्ये अजूनही विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्त यांच्या निर्देशानुसार उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी महानगरपालिका शाळांमध्ये ‘कुछ मस्ती कुछ पढाई’ उपक्रम, वाचन, लेखन व अंकगणित सुधारणा यासारखे विविध उपक्रम राबविले आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेकडून प्रत्येक शाळेला मनोवैज्ञानिक खेळ साहित्य पुरविण्यात आले आहे. या खेळांचा तसेच अन्य शैक्षणिक साहित्यांचा प्रभावी वापर व्हावा म्हणून दोन नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -