Sunday, December 22, 2024
Homeनोकरीआयडीबीआय बँकेतील नोकरीची 'ही' संधी सोडू नका ,मिळणार चांगला पगार ;जाणून घ्या...

आयडीबीआय बँकेतील नोकरीची ‘ही’ संधी सोडू नका ,मिळणार चांगला पगार ;जाणून घ्या अर्ज कसा करावा? पगार किती?

बँकेत नोकरी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्याला आयडीबीआय बँकेने एक चांगली संधी दिली आहे. आयडीबीआय बँके मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यासाठी अर्ज करू शकता.

अर्ज भरण्याची प्रक्रिया आता चालू झाली आहे.

आयडीबीआय बँकेकडून मेडिकल ऑफिसर या पदाच्या एकूण 6 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्हालाही आयडीबीआय या बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर 3 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. बँकेन या जागेसाठी काही अटी ठेवल्या आहेत.

मेडिकल ऑफिसर पदासाठी नेमक्या योग्यता काय?

आयडीबीय बँकने या पदासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अर्जदाराकडे अॅलोपॅथिमध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे दिली गेलेली कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठ, कॉलेजची एमबीबीएस/एमडी ही पदवी असायला हवी.

वयाची नेमकी अट काय?

या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जून 2024 पर्यत 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

आयडीबीआय बँकेत अशी मिळणार नोकरी

मेडकल ऑफिसर या पदासाठी निवड करताना योग्यत आणि अनुभवाचा विचार केला जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. मुलाखतीनंतर पात्र उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करून करून त्याची निवड केली जाईल.

भरतीची जाहिरात आणि अधिसूचना येथे पाहा

IDBI Recruitment 2024 साठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

IDBI Recruitment 2024 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य माहिती

आयडीबीआय बँकेत मेडिकल ऑफिसर या पदावर यशस्वीपणे निवड झालेल्या उमेदवाराला 1000 रुपये प्रतितास या प्रमाणे वेतन मिळेल. उमेदवाराला अन्य भत्तेदेखील मिळतील. यामध्ये प्रतिमहिना 2000 रुपये याप्रमाणे वाहन भत्ता दिला जाईल. तसेच कंपाउंडिंग फीसच्या रुपात (लागू असेल तर) 1000 रुपये प्रति महिना मिळेल. ही एक पार्ट टाईम कंत्राटी नोकरी आहे. या नोकरीसाठी कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

अर्ज कसा करावा?

आयडीबीआय बँकेत मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला डेप्यूटी जनरल मॅनेजर, मनुष्यबळ विभाग, आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र-400005 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -