Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची इचलकरंजीस भेट पंचगंगेसह पूरबाधित भागांची पाहणी

इचलकरंजी : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची इचलकरंजीस भेट पंचगंगेसह पूरबाधित भागांची पाहणी

महाराष्ट्र पुर नियंत्रण विकास कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम प्रगतीत आहे.याबाबत तांत्रिक सामाजिक आर्थिक बाबी तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या जोलांता क्रिप्सीन वॉशिंग्टन, शिना अरोरा, जार्क गॉल पॅरिस, रुनिता चौधरी, देविका पानसे, अतुल खुराणा, निखिल पांगम, पृथ्वीराज राजुकोन यांच्या शिष्टमंडळाने बुधवार ता. २६ जून रोजी इचलकरंजी शहरास भेट दिली.

महानगरपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्त यांचे दालनात झालेल्या बैठकीत या महानगरपालिके च्या वतीने पी. पी. टी. च्या माध्यमातून स्लाईड शोद्वारे सादरीकरण करण्यात आले. शिष्टमंडळास पूर परिस्थितीमध्ये जलमय होणारा नागरी भाग तसेच सन २०१९ व २०२१ या वर्षामध्ये जलमय झालेल्या इचलकरंजी शहराचे व्हिडिओ चित्रीकरणाचे सादरीकरण करणेत आले. त्याचबरोबर पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला पूर परिस्थितीत कारणीभूत असणाऱ्या सर्व बाबींची माहिती घेण्यात आली तसेच पूर टाळण्याकरिता करण्यात येण्यासारख्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -