मुंबई : टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेला हरवून 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला.
यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र साऊथ आफ्रिका विजयाचे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. ज्यामुळे टीम इंडियाने 7 धावांनी हा सामान जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे
फायनल सामन्यात विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना विराटने आपला हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप आहे असे जाहीर करून यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हंटला, ” हा माझा शेवटचा T20 सामनाही होता. या फॉरमॅटला अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. मला याचा प्रत्येक क्षण आवडला आहे. या फॉरमॅटमध्ये खेळून मी माझ्या भारतीय कारकिर्दीला सुरुवात केली. मला हेच हवे होते, मला चषक जिंकायचा होता. मला काहीही करून तो मिळवायचा होता. आता आनंद शब्दात मांडणे फार कठीण. तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. मी माझ्या आयुष्यात हे टायटल मिळवण्यासाठी खूप आसुसलेलो होतो आणि अखेर आम्ही ते पूर्ण केले याचा आनंद झाला”.
रोहित शर्माची कारकीर्द :
रोहित शर्माने भारतासाठी एकूण 159 टी २० क्रिकेट सामने खेळले. यात त्याने 4231 धावा केल्या. दरम्यान त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर हा 121 धावा होता. रोहितने टी 20 क्रिकेट खेळताना 5 शतक तर 32 अर्धशतक ठोकली. तर 383 चौकार आणि तब्बल 205 सिक्स मारले. रोहितने त्याच्या टी २० कारकिर्दीत गोलंदाजी करून एक विकेट सुद्धा घेतल.