Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञान‘या’ कंपनीच्या वेगवेगळ्या कार खरेदीवर बंपर डिस्काऊंटची ऑफर, काही लाख वाचवण्याची संधी

‘या’ कंपनीच्या वेगवेगळ्या कार खरेदीवर बंपर डिस्काऊंटची ऑफर, काही लाख वाचवण्याची संधी

जुलैमध्ये नव्या कार्सच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात पैसा वाचवण्याची संधी आहे. काही लाख रुपये तुम्ही वाचवू शकता. एका कंपनीने त्यांच्या वेगवेगळ्या कार्सवर बंपर डिस्काऊंटच्या ऑफर्स दिल्या आहेत.

 

नव्या कारच्या खरेदीचा प्लान असेल, तर हुंडईच्या ऑफर्सचा जरुर विचार करा. जुलै 2024 मध्ये कंपनीने मोठे डिस्काऊंट ऑफर्स दिले आहेत. हुंडईच्या कार तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतच्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करु शकता. कंपनीच्या अनेक कार्सवर तुम्हाला पैसे वाचवण्याची संधी आहे. (Hyundai)

 

सर्वात जास्त डिस्काऊंट Tucson SUV वर मिळतोय. या कारच्या 2023 मॉडलवर (डीजल) तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. पेट्रोल वेरिएंटवर 50,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. 2024 पेट्रोल मॉडलवर 25,000 रुपये आणि डीजल वेरिएंटवर 50,000 रुपये वाचवण्याची संधी आहे. (Hyundai)

 

हुंडई अल्काजारच्या या महिन्यातील खेरदीवर 85,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. हा बेनिफिट कॅश डिस्काउंट, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स स्वरुपात आहे. अल्काजार 6 आणि 7 सीटर ऑप्शनसोबत येते. 2023 आणि 2024 दोन्ही मॉडलवर तुम्हाला डिस्काऊंट ऑफर्सचा फायदा मिळेल. (Hyundai)

 

हुंडई वेन्यूच्या टर्बो-पेट्रोल वेरिएंट खरेदीवर 55,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. डुअल-क्लच गियरबॉक्स वेरिएंटवर 50,00 रुपये वाचवता येतील. बिगर टर्बो-पेट्रोल वेरिएंट खरेदीवर 45,000 रुपयापर्यंत सवलत मिळू शकते. हुंडई ऑरा तुम्ही 43,000 रुपये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. (Hyundai)

 

हुंडईची हॅचबॅक कार 48,000 रुपये स्वस्तात मिळेल. I20 खरेदीवर तुम्ही 45,000 रुपये वाचवू शकता. त्याशिवाय हुंडई वरना खरेदीवर 35,000 रुपये डिस्काऊंट मिळतोय. स्टॉक आणि लोकेशनच्या आधारावर डिस्काऊंट ऑफर्समध्ये फरक असू शकतो. (Hyundai)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -