Saturday, July 13, 2024
Homeक्रीडारोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा…..; जय शाह यांच्या विधानाने क्रिकेटप्रेमी खुश

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा…..; जय शाह यांच्या विधानाने क्रिकेटप्रेमी खुश

-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय संघाचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी हा वर्ल्डकप राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित केला आहे. तसेच आगामी WTC आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा नक्कीच जिंकू असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला. याबाबतचा एक विडिओच जय शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत जय शाह म्हणाले, या ऐतिहासिक विश्वचषक विजयबद्दल टीम इंडियाचे मी अभिनंदन करतो. टी-२० विश्वचषकातील विजय मला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर २०२३ मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण चषक जिंकू शकलो नाही. मी राजकोटमध्ये सांगितले होते की, जून 2024 मध्ये आम्ही चषकाबरोबरच मनेही जिंकू. आम्ही भारतीय ध्वजही फडकवू आणि आमच्या कर्णधाराने ध्वज फडकावला.

या विजयात शेवटच्या पाच षटकांचा मोठा वाटा होता. या योगदानाबद्दल मी सूर्यकुमार, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याचे आभार मानू इच्छितो. या विजयानंतर पुढचा टप्पा डब्ल्यूटीसी फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण या दोन्ही स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन बनू. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद असं जय शाह यांनी म्हंटल.

कधी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप?

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये असून ती पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. तर 9 मार्च 2025 रोजी अंतिम सामना होणार आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जूनमध्ये लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -