Saturday, July 13, 2024
Homeराशी-भविष्यसात दिवसांनंतर पैसाच पैसा! त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘हे’ तीन राशीधारक कमावणार पद,...

सात दिवसांनंतर पैसाच पैसा! त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘हे’ तीन राशीधारक कमावणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या लोकांवर पाहायला मिळतो. सध्या भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि बुद्धी, वाणीचा कारक बुध हे ग्रह कर्क राशीत विराजमान आहेत. तसेच ग्रहांचा राजा सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करील.

कर्क राशीत या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. कर्क राशीत हा त्रिग्रही योग १९ जुलैपर्यंत असेल. हा काळ १२ राशींतील काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. बुध, शुक्र व सूर्य यांच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

 

मिथुन

 

त्रिग्रही योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शुभ परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. तुम्ही सकारात्मक राहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

 

सिंह

 

त्रिग्रही योगाचा फायदा सिंह राशीच्याव्यक्तींनादेखील होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल, कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल.

वृश्चिक

 

त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -