Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रभूकंपामुळे नासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत? मराठवाड्यातून जागतिक प्रयोगशाळा बाहेर राज्यात जाणार?

भूकंपामुळे नासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत? मराठवाड्यातून जागतिक प्रयोगशाळा बाहेर राज्यात जाणार?

मराठवाडा आज सकाळीच भूकंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, तर विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

 

आज सकाळी मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूंकपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तर नासाचा मराठवाड्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पण अडचणीत आला आहे.

 

गावागावात सकाळीच नागरिकांची पळापळ

 

आज सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 7.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची 4 पूर्णांक 05 अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धक्क्यांने नागरिक भयभीत झाले. ते घराबाहेर धावत आले. अनेक गावागावात सकाळीच नागरिकांची पळापळ झाली. काही गावातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

 

रामेश्वर तांडा हे केंद्रबिंदू

 

आज हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. गेल्यावर्षी पण येथेच केंद्रबिंदु होता. 21 मार्च 2024 रोजी याच ठिकाणी 4.5 रिस्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता. पुन्हा त्याच तीव्रतेचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

काय आहे लिगो प्रयोगशाळा?

 

गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात नासा प्रयोगशाळा उभारत आहे. भारतातील ही पहिली प्रयोगशाळा लिगो इंडिया प्रकल्प (Ligo India Project) उभारण्यात येत आहे. ही जगातील तिसरी सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. औंढा तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा या भागात या प्रयोगशाळेचे काम सुरु आहे. या प्रयोगशाळेसाठी 171 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर सरकारने 40 हेक्टर जमीन दिली आहे. ही प्रयोगशाळा भौतिकशास्त्र या विषयावरील अभ्यास करण्यासाठी उभारण्यात येते.

 

नासाचा प्रकल्प अडचणीत

 

भूकंपप्रवण क्षेत्रात अशी प्रयोगशाळा उभारता येत नाही. पण गेल्या चार वर्षांत हिंगोली जिल्ह्यात 25 वेळा भूंकप झाले आहेत. त्यामुळे आता ही प्रयोगशाळा अडचणीत सापडू शकते आणि हा प्रकल्प कदाचित बाहेरील राज्यात जाण्याची भीती एमजीएम अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -