Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगमराठवाड्यासह विदर्भातील या जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, प्रशासनाने नागरिकांना केले हे महत्वाचे आवाहन

मराठवाड्यासह विदर्भातील या जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, प्रशासनाने नागरिकांना केले हे महत्वाचे आवाहन

मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सकाळीच भूकंपाने हादरवले. त्यामुळे नागरीक भयभीत झाले. अनेकांनी खुल्या जागांकडे धाव घेतली. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत

आज सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 7.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची 4 पूर्णांक 05 अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धक्यांने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर आले आहेत.

या भागांना जाणवले भूकंपाचे धक्के

विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी 7:15 मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. 2 महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते.

रामेश्वर तांडा हे केंद्रबिंदू

आज हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर अकोला जिल्ह्यातील काही भागातही धक्के बसले. अमरावती, चंद्रपूर ते तेलंगणात करीम नगरपर्यंत भूकंपाचे धक्के बसल्याचे दिसत आहे.

प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

भूवैज्ञानिक सर्वेक्षण करावे

भूंकपाचे सतत धक्के जाणवत आहेत. हिंगोली आणि परभणीत असे प्रकार समोर येत आहेत. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. ही तीव्रता अधिक आहे. त्यामुळे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करावे असे मत एमजीएम अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आज सकाळी परभणीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्हाभरात कुठेही जीवित किंवा मालमत्तेचा नुकसान झाले नाही. प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -