एकीकडे जगात इलेक्ट्रिक कार नंतर आता ड्राइवरलेस कारची चर्चा होताना असतानाच दुसरीकडे भारताचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याच ड्राइवरलेस कारच्या मुद्द्यावरून एक महत्वाचे विधान केले आहे.
जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत ड्राइवरलेस गाड्यांना भारतात प्रवेश मिळणार नाही, असे नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकून अनेक जणांनी आपल्या भुवया उंचावल्या आहे. भविष्यातील वाहनांना भारतात येण्यापासून का रोखले जात आहे, अशा शब्दात लोकं सध्या प्रश्न विचारात आहे. पण या विधानामागील कारणही गडकरींनी स्पष्ट केले असून ते कारण जाणून घेतल्यावर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल.
नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की, सध्या मी भारतात ड्रायव्हरलेस कार्सना प्रवेश देणार नाही. याचे कारण म्हणजे देशातील 80 लाख चालकांचा रोजगार. ही 80 लाख कुटुंबे बेरोजगार होऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. भारतात ड्रायव्हरलेस कारची गरज नाही. त्यामुळे लोकांचा रोजगार संपवण्याचे साधन बनणाऱ्या या तंत्रज्ञानाला मी कधीही मान्यता देणार नाही. हे पाऊल लाखो चालकांना त्यांच्या नोकऱ्यांपासून दूर फेकून देऊ शकते.
याच कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरी म्हणाले,” मी अमेरिकेला सुद्धा सांगून ठेवले होते की कोणत्याही परिस्थिती मी भारतात ड्राइवरलेस कारला मंजुरी देणार नाही. भारत देशात मोठ्या संख्येने लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि जर ड्राइवरलेस कार भारतात आल्या तर त्यांच्या उदरनिर्वाहाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा कार्सना आपल्या देशात प्रवेश मिळू नये. तसेच या अशा कार्सचे भारतात सध्या तरी काहीच भविष्य नाही”.