गेल्या 48 तासापासून राज्यात धुवाधार पाऊस पडत होता. मात्र पहाटे पासून या पावसाने विश्रांती घेतली आहे. आता दुपारपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अशा नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार,आज राज्यातील मराठवाडा व विदर्भ या प्रांतात चांगलाच पाऊस बरसू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपुर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई आणि कोकणाचा विचार केला तर मुंबई शहर व उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं आवहान शासनाने केले आहे. पुढील काही तासात कोकणाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.