Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीपंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅप टाकण्याचा शुभारंभ

पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅप टाकण्याचा शुभारंभ

इचलकरंजी

महापूरामुळे सातत्याने निर्माण होणारी पूर परिस्थिती दूर होण्यासाठी येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या पुलाच्या कामामुळे गावभाग मळेभागातील नागरिकांना सतावणारा महापूराचा प्रश्‍न दूर होण्यास मदत होणार आहे.

नदीवेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर कमानी असलेला पूल होता. तो यशोदा पूल म्हणून ओळखला जात होता. काही वर्षांपूर्वी हा पूल रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आला. त्याठिकाणी मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली. परंतु पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या नळातून योग्य त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी मळेभागात पसरून घरात शिरते. त्यामुळे यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकांतून केली जात होती. या संदर्भात आमदार आवाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करतानाच सन 2019 व 2021 साली महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थितीची शासन दरबारी माहिती देत पुलाची गरज पटवून दिली होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै 2022 च्या अर्थसंकल्पात यशोदा पूल येथे बॉक्ससेल बांधण्यासाठी तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. या कामामुळे शेतकरी व मळेभागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी संजय कुलकर्णी, अजय जाधव, उल्हास लेले व महावीर कोल्हापूरे यांनी आमदार आवाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, संजय कुलकर्णी, अजय जाधव, उल्हास लेले, महावीर कोल्हापूरे, सौ. उर्मिला गायकवाड, शहनाज मुजावर, पापालाल मुजावर, अहमद मुजावर, नरसिंह पारीख, सागर कम्मे, महावीर कुरुंदवाडे, बाबासाहेब पाटील, शैलेश गोरे, नंदू पाटील, राजू दरीबे, अविनाश कांबळे, राजू कोरे, राजेंद्र बचाटे, सीमा कमते, सपना भिसे, शिवाजी काळे, बाळू मिठारी, राजू चव्हाण, कटके बंधू यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -