आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Election 2024) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय. अशातच अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महिलांना दरमाहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी गावागावांतील महिलांनी गर्दी केली आहे. पण आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, या योजनेचे पैसे खात्यात कधीपासून जमा होण्यास सुरुवात होणार? याच प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून दिलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लवकरच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे वळते होतील. त्यांना देखील एक हातभार लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात बोलताना सांगितलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojna) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय? यावरुन बराच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.
आता याबाबतची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? याचे वेध लागले आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरू असल्यानं योजनेचे पैसे कधी मिळणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोण असणार पात्र?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्र लागणार?
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.