Friday, October 18, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील पाणी पातळीत वाढ; पहा आत्ताची स्थिती 

इचलकरंजीतील पाणी पातळीत वाढ; पहा आत्ताची स्थिती 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस(dams) सुरू आहे, ज्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसाच्या या जोरदार सत्रामुळे नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे आणि जिल्ह्यातील ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. इचलकरंजीतील पाणी पातळीत सध्या वाढ झालेली आहे दुपारी दीड वाजता 64.8 फूट इतकी पाणी पातळी वाढलेली आहे.

 

सध्या पंचगंगा नदीच्या पाण्याची(dams) पातळी ४०.११ फूटांवर पोहोचली आहे. नदीच्या पाण्याच्या वाढीमुळे कोल्हापूर शहरालगत असलेल्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

 

प्रयाग चिखली येथे भोगावती-तुळशी, कुंभी-कासारी आणि सरस्वती या गुप्त नद्या पंचगंगा नदीच्या सुरुवातीच्या ठिकाणी एकत्र येतात, आणि येथे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

 

नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी ९२०९२६९९९५ हा मोबाईल क्रमांक सेव्ह करून व्हॉट्सअॅपवरून १ ते ६ क्रमांक मेसेज करून पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते इत्यादीबद्दलची सर्व माहिती मिळवावी, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -