Friday, November 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी -टाकवडे संपर्क तुटला : रस्त्यावर तीन ते चार फुट पाणी

इचलकरंजी -टाकवडे संपर्क तुटला : रस्त्यावर तीन ते चार फुट पाणी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचायतीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे 81 बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

तर आज सकाळी इचलकरंजी टाकवडे या मार्गावर देखील पंचगंगा नदीचे पाणी आल्याने वाहतूक आता येथील पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावर आता तीन ते चार फूट पाणी असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे आता टाकलेला जाणारी व येणारी वाहने जनवाडे मळा व जांभळी रस्त्यामार्गे सुरू झाली आहेत.

राधानगरी धरणाचा 1 दरवाजा उघडला: धरण 100% भरले

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार तसेच दमदार पावसाने कहर केला असून हा पाऊस सुरूच आहे. यामुळे राधानगरी धरणाचा शंभर टक्के भरले असून आज सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. धरणाचा हा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा असून यातून आता 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

अशी होती सकाळची स्थिती….

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार तसेच दमदार पावसाने राधानगरी धरण आता 98.20% भरले आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 346.72 फूट झाली आहे. आता अर्धा फूट पाणी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास कमी आहे.

यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या धरणाची दरवाजे आता कोणत्याही क्षणी उघडू शकतात. दरम्यान धरणातून वीजगृहासाठी दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -