Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील रस्ते विकासासाठी 51 कोटीचा निधी मंजूर

इचलकरंजीतील रस्ते विकासासाठी 51 कोटीचा निधी मंजूर

इचलकरंजी

महापूरामुळे खराब झालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महानगरपालिका हद्दीतील सर्वच प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरोत्थान योजनेतून 50.16 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. या संदर्भात मागील वर्षभरापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. आता निधी मंजूर झाल्याने रस्त्यांचे मजबुतीकरण व बळकटीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इचलकरंजी शहर व परिसरात सन 2019 व 2021 मध्ये आलेला महापूर आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक अंतर्गत तसेच गल्ली-बोळातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाली होती. या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि बळकटीकरणासाठी आमदार आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील होते. इचलकरंजी शहरातील विविध प्रलंबित विकासकामांच्या अनुषंगाने 17 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाची बैठक झाली होती. त्या बैठकीत इचलकरंजी शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी नगरोत्थान मधून 100 कोटीची मंजुरीही देण्यात आली होती. महानगरपालिकेने सादर केलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावापैकी काही रस्ते डीपी रस्ते असल्याने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने शासनास प्रस्तावित केलेले होते. ते रस्ते नगरोत्थान महाभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेकडून 50.16 कोटीच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने 50.16 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेदेखील सहकार्य मिळाल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -