Saturday, September 7, 2024
Homeक्रीडाआयपीएलमध्ये लागली होती 10 कोटींची बोली, आता स्टार खेळाडूवर फक्त एक लाखात...

आयपीएलमध्ये लागली होती 10 कोटींची बोली, आता स्टार खेळाडूवर फक्त एक लाखात खेळण्याची वेळ

महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीगसाठी 25 जुलैला लिलाव पार पडला. या लीगमध्ये एकूण सहा संघ खेळणार आहे. मैसूर वॉरियर्स, गुलबर्गा मिस्टिक्स, मंगळुरु ड्रॅगन्स, बंगळुरु ब्लास्टर्स, हुबली टायगर्स आणि शिवमोग्गा लायन्स या सहा संघांचा समावेश आहे.राहुल द्रविडचा मुलगा समित याचीही मैसूर वॉरियर्स संघात निवड झाली आहे. या लीग स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलेले स्टार खेळाडूही खेळणार आहेत. यात प्रसिद्ध कृष्णा, मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मनिष पांडे या खेळाडूंचा समावेश आहे. पण दिग्गज खेळाडूसाठी फक्त 1 लाख रुपये मोजल्याने आश्चर्य होत आहे.

मैसूर वॉरियर्सने त्याच्यासाठी 1 लाख रुपय मोजले. आयपीएलच्या एका पर्वातून प्रसिद्ध कृष्णाने 10 कोटी कमावले होते. मात्र आता त्याच्यावर 1 लाख रुपयात महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीग खेळण्याची वेळ आली आहे प्रसिद्ध कृष्णा मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.कृष्णा क्वाड्रिसेप्स सर्जरीमुळे जानेवारीपासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता.

 

प्रसिद्ध कृष्णा 2018 पासून आयपीएल स्पर्धा खेळत आहे. मात्र दुखापतीमुळे मागच्या दोन पर्वात खेळला नाही. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 10 कोटी मोजले. आयपीएल 2023 मध्ये 10 कोटींसह संघात होता. तर आयपीएल 2024 मध्ये दुखापतीमुळे खेळला नाही. आयपीएलमध्ये त्याने 51 सामने खेळले आहेत. यात 8.92 च्या इकोनॉमी रेटने 49 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, महाराजा ट्रॉफी केएससीए लीगसाठी झालेल्या ऑक्शनमध्ये प्रसिद्ध कृष्णा 2 लाख रुपयांसह कॅटेगरी ए चा भाग होता. मात्र पहिल्या फेरीत त्याला कोणीत संघात घेतलं नाही. त्यामुळे एक लाखांच्या बेस प्राईससह पुन्हा दुसऱ्या फेरीत उतरला. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा खेळत असलेला संघात राहुल द्रविडचा मुलगा समितही आहे. त्याच्यासाठी संघाने 50 हजार रुपये मोजले.

 

प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. भारतासाठी 2 कसोटी, 17 वनडे आणि 5 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत त्याने 2 विकेट, वनडेत 29 आणि टी20 क्रिकेटमध्ये 8 गडी बाद केले आहेत. प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यात एक कसोटी सामना होता. आता प्रसिद्ध कृष्णा कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -