Wednesday, October 30, 2024
Homeतंत्रज्ञानVivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत फक्त 7,999 रुपये

Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत फक्त 7,999 रुपये

लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात एक स्वस्तात मस्त असा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y18i असं या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने हा मोबाईल अवघ्या 7,999 रुपयांत बाजारात आणला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरेल. किंमत कमी असली तरी मोबाईल मध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. चला तर मग आज आपण याबाबत अगदी सविस्तर पणे जाणून घेऊयात…

 

डिस्प्ले –

कंपनीने Vivo Y18i मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,612 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 528 Nits च्या पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने स्मार्टफोनमध्ये Unisoc Tiger T612 प्रोसेसर बसवला असून विवो चा हा मोबाईल Android 14 वर आधारित FunTouch OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे.

 

कॅमेरा- Vivo Y18i

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 0.08MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, 4G LTE सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

 

 

किंमत किती ?

Vivo Y18i हा स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेजमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत 7,999 रुपये आहे. हा हँडसेट ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही हा मोबाईल हिरव्या आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -