जिओ आणि एअरटेल सारख्या खाजगी नेटवर्क कंपन्यांनी रीचार्जमध्ये(recharge) दरवाढ करून महिना होत आला आहे. तरी रीचार्ज ग्राहकांना परवडणारे नसतानाही नाईलजास्तव ते खाजगी नेटवर्क वापरत असल्याची प्रतिक्रिया ग्राहक वर्गातून येत आहे.
भारतातील सर्वात मोठा सरकारी दूरसंचार सेवा देणारी BSNL कंपनी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे 4G रिचार्ज(recharge) प्लान्स ऑफर करते. फक्त 18 रुपये ते 1999 रुपयांपर्यंतच्या या प्लान्समध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि SMS सारखे फायदे मिळतात. इतर कंपन्या 5G सेवा सुरु करत असतानाही BSNL अनेक पर्यायी 4G प्लान्स देऊ करत आहे. या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि मोठा डेटा यांचा समावेश असून ते विविध ग्राहकांच्या गरजांना अनुरूप आहेत.
डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फायद्यांसह सर्वोत्तम BSNL रिचार्ज प्लान्स:
18 रुपये: 2 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा
87 रुपये: 14 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, दररोज 100 SMS
99 रुपये: 18 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, मोफत प्रीबीटी
105 रुपये: 18 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 2GB डेटा
अशाच प्रकारे पुढील अनेक आकर्षक प्लान्स आहेत. BSNL रिचार्ज प्लान्स निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्या डेटा वापरावर आणि कॉलिंग गरजेवर अवलंबून प्लान्स निवडा. दीर्घकालीन वैधता असलेले प्लान्स जास्त किफायतशीर असू शकतात.
काही प्लान्समध्ये मोफत SMS आणि इतर फायदे देखील समाविष्ट असतात. BSNLच्या वेबसाइटवर किंवा अॅपवर जाऊन तुम्हाला सर्व नवीनतम रिचार्ज प्लान्स भेटू शकतात.
SMS पॅक: BSNL अतिरिक्त SMS पॅक देखील ऑफर करते. या पॅकमध्ये तुम्हाला खूप कमी दरात अनेक SMS पाठवण्याची परवानगी मिळते.
फुल टॉकटाइम टॉप-अप: BSNL अनेक फुल टॉकटाइम रिचार्ज पॅक देखील देते. या पॅकमध्ये तुम्हाला केवळ कॉलिंगसाठी वापरता येणारी रक्कम मिळते.
BSNL अनेक पर्यायी आणि किफायती 4G रिचार्ज प्लान्स ऑफर करतो. तुमच्या गरजेनुसार योग्य प्लान निवडून तुम्ही हायस्पीड इंटरनेट आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.
BSNL कडून देण्यात येणाऱ्या अनलिमिटेड प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती
₹ 18: 2 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा
₹ 87: 14 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 100 SMS प्रतिदिन
₹ 99: 18 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, मोफत PRBT
₹ 105: 18 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 2GB डेटा
₹ 118: 20 दिवसांसाठी दररोज 0.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, मोफत PRBT
₹ 139: 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, दररोज 1.5GB डेटा, 100 SMS प्रतिदिन
₹ 147: 30 दिवसांसाठी 10GB डेटा, अनलिमिटेड कॉल
₹ 184 ते ₹ 187: 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड कॉल (विविध पर्यायी पॅकेजेस)
₹ 228 ते ₹ 299: 1 ते 3GB दररोज डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 100 SMS प्रतिदिन (विविध पर्यायी पॅकेजेस आणि वॅलिडिटी)
₹ 319: 75 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल
₹ 347 ते ₹ 769: 56 ते 84 दिवसांसाठी दररोज 2 ते 12GB डेटा, अनलिमिटेड कॉल (विविध पर्यायी पॅकेजेस आणि वॅलिडिटी)