Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवडमध्ये सुन्न करणारी घटना, तरुणीने लग्नास नकार दिला, नराधमाकडून क्रूर कृत्य,...

पिंपरी चिंचवडमध्ये सुन्न करणारी घटना, तरुणीने लग्नास नकार दिला, नराधमाकडून क्रूर कृत्य, पुणे हादरलं

राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पनवेलच्या उरण येथील घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. असं असताना पनवेल येथील न्हावा गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला.

यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या दोन घटनांनंतर पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून देखील अशीच एक सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरातील महाळूंगे पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण येथे काल रात्री प्राची विजय माने या 21 वर्षाच्या तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून प्राची माने हिचा खून करण्यात आला असं आता पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. प्राची मानेच्या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-3 पोलीस पथकाने अविराज रामचंद्र खरात या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपीचं क्रूर कृत्य

प्राची ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची मूळ रहिवासी होती. त्याच भागातील अविराज रामचंद्र खरात याला प्राचीने लग्नास नकार दिला होता. त्यानंतर प्राची ही महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण या भागात वास्तव्यास आली होती. प्राचीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अविराज रामचंद्र खरात यांनी आंबेठाण या ठिकाणी येऊन प्राचीच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून तिचा खून करून पसार झाला होता.

 

मात्र, पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 पोलीस पथकाने घटनास्थळा जवळील आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले. या सीसीटीव्हीत अविराज रामचंद्र खरात हा सांगलीकडे आपल्या मोटरसायकलवरून पळत जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी आरोपी अविराजला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -