Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगगुंतवणूकदारांनी 'या' 5 शेअर्सपासून सावध रहा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान! ब्रोकरेजने...

गुंतवणूकदारांनी ‘या’ 5 शेअर्सपासून सावध रहा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान! ब्रोकरेजने दिला इशारा

शेअर बाजारात कमाईच्या बर्‍याच संधी असतात पण चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यताही असते. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांनी वेळोवेळी सावध राहिले पाहिजे. आता विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे वाचवण्यासाठी 5 शेअर्सपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण या 5 शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्याचा धोका जास्त आहे.

 

टाटा केमिकल्स: टाटा समूहाचा हा शेअर आज 2 टक्क्यांनी वाढून 1,092 रुपयांवर व्यवहार करत आहे, परंतु एका वर्षात तो 16 टक्क्यांहून अधिक घसरण्याची शक्यता आहे. 6 ब्रोकरेज कंपन्यांनी हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहेत.

 

बर्गर पेंट्स इंडिया: हा शेअर आज 0.18 टक्के वाढीसह 543 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. शेअरचे वार्षिक लक्ष 492 रुपये आहे, म्हणजे 6 टक्क्यांहून अधिक घसरण होण्याची शक्यता आहे. 13 ब्रोकरेज कंपन्यांनी हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.

 

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस: आजच्या व्यवहार सत्रात या तंत्रज्ञान कंपनीचा शेअर 0.40 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो 5,200 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. ब्रोकरेज फर्मने एका वर्षात 4,461 रुपये लक्ष्य दिले असल्याने हा शेअर सुमारे 13 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. 17 ब्रोकरेज कंपन्यांनी शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.

 

एमआरएफ: या यादीमध्ये, देशातील सर्वात मोठ्या शेअरचे नाव एमआरएफ आहे. हा शेअर 0.42 टक्के वाढीसह 1,39,450 रुपयांवर व्यवहार करत आहे. यात 17 टक्के घट होण्याची शक्यता आहे. 8 ब्रोकरेज कंपन्यांनी हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.

 

येस बँक: आजच्या व्यवहारात सुरुवातीच्या सत्रात खासगी क्षेत्राचा हा बँकिंग शेअर सुमारे 1 टक्के वाढीसह 25 रुपयांवर व्यवहार करत आहे. 10 ब्रोकरेज कंपन्यांनी येस बँकेच्या शेअरची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजला भीती आहे की वर्षभरात या शेअरची किंमत 32 टक्क्यांहून अधिक

घसरू शकते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -