Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंगFASTag वापराल तर होतील असे फायदे, दुप्पट टोल भरण्याऐवजी वाचाल की नाही

FASTag वापराल तर होतील असे फायदे, दुप्पट टोल भरण्याऐवजी वाचाल की नाही

फास्टॅगमुळे प्रवास अजून जलद झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका लागला तरी आता पूर्वीसारखं त्यावर रांगेत प्रतिक्षा करायची गरज नाही. फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर (RFID) काम करते. त्याआधारे टोल नाक्यावर टोल कपात होते.

 

टोल देण्यासाठी आता खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज नाही. अथवा सुट्या पैशांसाठी कटकट घालण्याची पण गरज नाही. फास्टॅगमुळे आता खात्यातून परस्पर टोल शुल्क वसूल होते.

 

फास्टॅगचा वापर केला तर काही कंपन्या प्रमोशनल कॅशबॅक देतात. फास्टॅगसाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो.

 

फास्टॅग खात्यातून रक्कम ऑटो डेबिट होत असल्याने टोल प्लाझावर लांबच लांब रांगेत प्रतिक्षेची गरज नाही. फास्टॅगचा व्यवहार जलद होतो. त्यामुळे टोल प्लाझावर प्रतिक्षा करण्याची गरज पडत नाही.

 

फास्टॅग, ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज करता येते. पैसे संपले तरी मोठी अडचण येत नाही. कोणत्याही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT, RTGS वा नेट बँकिंगच्या माध्यमातून फास्टॅग रिचार्ज करता येते.

 

फास्टॅगवर जो मोबाईल नंबर लिंक केला आहे. त्यावर ग्राहकांना एसएमएस येतो. त्याआधारे त्याला अलर्ट्स मिळतात. कंपन्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर टोल नाक्यावरील व्यवहार, शिल्लक रक्कमेची कमी याची माहिती देतात..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -