Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रशाळेतील दूध मुलांसाठी ठरले बाधक, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दुधात आळ्या

शाळेतील दूध मुलांसाठी ठरले बाधक, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दुधात आळ्या

पुणे येथील घोडेगावमधील निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा हा प्रकार झाला आहे. परंतु संबंधित ठेकेदारावर अजून कोणतीही कारवाई केली गेली नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नाष्ट्यातील दुधात जिवंत आळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहे. या घटनेनंतर बिरसा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यांनी या प्रकरणी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

दीड महिन्यांपूर्वी जेवणात आळ्या

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील इंग्रजी माध्यम आदिवासी निवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना नास्त्यात नियमित दूध दिले जाते. या दुधाचे वाटप करताना त्यात आळ्या आढळून आल्याने खळबळ पसरली. दिड महिन्यांपूर्वी आदिवासी विद्यार्थींच्या जेवणात आळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता पँकिंगमध्ये दिले जाणाऱ्या दुधात आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थींच्या जीवाशी खेळ सुरु असून हा खेळ कोण खेळत असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

 

बिरसा ब्रिगेड आंदोलन करणार

बिरसा ब्रिगेडचे समीर गाडे म्हणाले की, मुलांच्या जीवनाशी खेळ होत आहे. आदिवासी विभाग आणि ठेकेदार मुलांचे जीव धोक्यात आणत आहे. यामुळे येत्या सात तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. बिरसा ब्रिगेड दीपक बाळकूडी यांनी सांगितले की, दुधात आळ्या सापडल्या आहेत. हे दूध ज्या ज्या आश्रम शाळेत पुरवले जाते, त्या ठिकाणी असा प्रकार घडल्याची शक्यता आहे. एका कंपनीला मोठे करण्यासाठी कंत्राट दिले जात आहे.

 

प्रकल्प अधिकारी म्हणतात, अन्न व औषध प्रशासनाकडे सॅम्पल पाठवणार

घोडगाव येथील प्रकल्प अधिकारी संदीप पाटील म्हणाले की, उंदरांनी दूधाचे बॉक्स १ ऑगस्ट रोजी कुरतळले होते. आम्हाला त्या जुन्या बॉक्समध्ये आणि नवीन पॅकेट उघडल्यावर त्यातही दुधात आळ्या सापडल्या आहेत. आता ते सॅम्पल अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवणार आहे. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -