Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशॉकिंग! सोसायटीच्या मिटींगमध्ये वाद; अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा अंगठा तोडला

शॉकिंग! सोसायटीच्या मिटींगमध्ये वाद; अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा अंगठा तोडला

राजधानी मुंबईतील (Mumbai) एका गृहनिर्माण सोसायटीतील धक्कादायक घटना समोर आली आहे. आज रविवार असल्याने सोसायटीच्यावतीने सदस्यांसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत सदस्य आणि अध्यक्षात चांगलीच जुंपली, त्याचे पडसाद चक्क हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. या हाणामारीत सोसायटीच्या अध्यक्षाने चक्क सोसायटी सदस्याचा अंगठाच कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मुंबईच्या दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यासोबत वाद झाला. या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप आदित्या यांनी केला आहे. या घटनेनं सोसायटीत चांगलीच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

दरम्यान, आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केली आहे. याप्रकरण एमएचबी पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -