Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रबिग बॉस मराठीसाठी इचलकरंजीच्या धनंजय पोवार, सूरज चव्हाण यांना मानधन किती ?  

बिग बॉस मराठीसाठी इचलकरंजीच्या धनंजय पोवार, सूरज चव्हाण यांना मानधन किती ?  

पहिला आठवडा फारच मनोरंजक ठरला. स्पर्धकांचा वाद आणि कल्ला पाहायला मिळाला. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीने चांगलाच ड्रामा केला. पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळीने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घालण्यात कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात भांडणे, नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशन पाहायला मिळालं. बिग बॉस मराठीच्या घरातील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला आहे.

 

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचं मानधन किती?

बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पुरुषोत्तम दादा पाटील आणि धनंजय पोवर नॉमिनेट झाले होते. त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुरुषोत्तम दादा यांचं एलिमिनेशन झालं. पहिल्या आठवड्यात सूरज सावंत खूपच शांत दिसला. मात्र, बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवल्यानंतर सूरजनेही आता खेळात उडी घेतली आहे. पहिल्या आठवड्यानंतर आता प्रत्येक स्पर्धकाचा बिग बॉसच्या खेळातील सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे.

 

डीपी दादा आणि छोटा पुढारीची फी किती?

यंदाचा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाराष्ट्रातील मातीतील माणसं पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक खूश झाले आहे. टिक टॉक स्टार सूरज चव्हाण या प्रेक्षकांचा खास पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर सूरजला लोक खूप प्रतिसाद देत आहेत. त्यासोबत धनंजय पोवार म्हणजे घरच्यांच्या लाडका डीपीदादा आता महाराष्ट्राचा डीपीदादा बनला आहे. त्यालाही लोक पसंत करत आहेत. यासोबत छोटा पुढारी घनश्याम दरोडेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि धनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळत आहे, हे जाणून घ्या.

 

बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सूरज चव्हाणला किती मानधन?

छोटा पुढारी उर्फ धनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला 50 हजार रुपये मानधन मिळत आहेत. कोल्हापूरचा ढाण्या वाघ बिग बॉसच्या घरातील सगळ्यांचा लाडका डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार याला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला 60 हजार रुपये मिळत आहेत. तर गुलिगत धोका फेम रिल स्टार सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉस मराठीमधील प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक ठरताना दिसत आहे. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला फक्त 25 हजार रुपये मानधन मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -