Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रचिकोडीजवळ अपघातात २ ठार, ४ जखमी गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परतताना...

चिकोडीजवळ अपघातात २ ठार, ४ जखमी गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परतताना काळाचा घाला

कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे जात असताना कार- गुड्स वाहन समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉसवर घडली.

 

सौरभ संजू कुलकर्णी (वय २२) व राकेश सुरेंद्र वाडकर (वय २३ दोघे रा. मुधोळ) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

मुधोळ येथील चारजण कारने गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. ते मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परत जात असताना रात्रीच्या वेळी बेळकुड क्रॉस नजीक निपाणी- महालिंगपूर राज्य महामार्गावर समोरून येणाऱ्या गुड्स वाहनाची जोराची धडक बसली. गुड्स वाहन चिकोडीतील सुभाष बजंत्री यांचे आहे. कारमधील दोघे ठार झाले. तर कार मधील आनंद घाटगे, विकास बेळगी व गुड्स वाहनातील सुभाष बजंत्री, त्याची पत्नी रेणुका बजंत्री (दोघे रा. चिकोडी) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबत चिकोडी पोलिसात नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -