Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंगहिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना झटका, काही सेकंदातच कोट्यवधी बुडले

हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना झटका, काही सेकंदातच कोट्यवधी बुडले

अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्यावर्षी अदानी यांच्यावर आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. आता या फर्मच्या नव्या रिपोर्टने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावेळी या फर्मने थेट सेबी अध्यक्षांवरच हल्ला चढवला आहे. अदानींच्या शेअर्स कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा होता, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने तपास होणे आवश्यक होते, तसा होऊ शकला नाही. हिंडनबर्ग रिपोर्टमधील या आरोपांचा शेअर बाजारावर आणि अदानींच्या शेअर्सवर परिणाम होताना दिसत आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच अदानी ग्रुपचे 1.28 लाख कोटी रुपये बुडाले. अदानींच्या बहुतांश शेअर्समध्ये 4 ते 6 टक्क्यांची घसरण दिसून आली. यामुळे अदावी ग्रुपची मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांनी खाली आली आहे. अदानी यांच्या कोणच्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये किती घसरण झाली आहे, ते जाणून घेऊया.

 

अदानींच्या शेअरमध्ये मोठी घसरण

 

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सध्या 4 टक्क्यांनी घसरून 3060 रुपयांवर आल्याचे दिसत आहे. तथापि, ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे शेअर्स 5.27 टक्क्यांनी घसरले आणि 3018.55 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3186.80 रुपयांवर बंद झाला.

अदानी पोर्ट अँड एसईझेडचे शेअर्स सध्या 2.17 टक्क्यांनी 1500 रुपयांवर घसरल्याचे दिसत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आणि 1457.35 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 1533.30 रुपयांवर बंद झाले.

 

अदानी पॉवरचे शेअर्स 3.14 टक्क्यांनी घसरून 673.25 रुपयांवर आले. मात्र, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर 11 टक्क्यांनी घसरून 619 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 695.10 रुपयांवर बंद झाले.

अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 2.28 टक्क्यांनी घसरून 1078.90 रुपयांवर आले. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे शेअर 17 टक्क्यांनी घसरले आणि 915.70 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1104.10 रुपयांवर बंद झाला.

 

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.18 टक्क्यांनी घसरून 1723.45 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 7 टक्के घसरून 1656.05 वर पोहोचला. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1780.10 रुपयांवर बंद झाला.

अदानी टोटल गॅसता शेअर 4.93 टक्क्यांनी घसरून 826.60 वर आला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 13.39 टक्के घसरून 753 वर पोहोचला. शुक्रवारी कंपनीचा शेअर 869.45 रुपयांवर बंद झाला.

तर अदानी विल्मारचे शेअर्स 2.82 टक्क्यांनी घसरून 374 रुपयांवर आहेत. पण, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 6.49 टक्क्यांनी घसरले आणि 360 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 385 रुपयांवर बंद झाला.

अदानींच्या कोणत्या कंपनीचे किती नुकसान ?

 

अदानी एंटरप्रायझेसचे 19,184.91 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 3,44,193.75 कोटी रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 3,63,378.66 कोटी रुपये होते.

अदानी पोर्ट आणि एसईझेचे 16,406.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 3,14,807.85 कोटी रुपये झाले. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 3,31,214.10 कोटी रुपये होते.

अदानी पॉवरचे 29,351.31 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 2,38,744.51 कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 2,68,095.82 कोटी रुपये होते.

 

अदानी एनर्जी सोल्युशन्सला 22,632.16 कोटी रुपये इतका तोटा झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1,10,001.45 कोटी रुपये झाले. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 1,32,633.61 कोटी रुपये होते.

अदानी ग्रीन एनर्जीचे 19,627.64 कोटी रुपये नुकसान झाले. कंपनीचे मार्केट कॅप 2,62,026.10 कोटी रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 2,81,653.74 कोटी रुपये होते.

अदानी टोटल गॅसला 12,807.29 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीचे मार्केट कॅप 82,815.69 कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 95,622.98 कोटी रुपये होते.

अदानी विल्मरचे 3,249.2 कोटी रुपये नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 46,788.43 कोटी रुपयांवर आले.

ACC लिमिटेडला 879.79 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 43,266.18 कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 44,145.97 कोटी रुपये होते.

अंबुजा सिमेंटचे 3,952.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1,51,729.35 कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 1,55,681.40 कोटी रुपये होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -