रेशनवरील धान्य वाटपाच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या अजूनही दुरुस्त न झाल्याने रेशन धान्य दुकानांमधून आॉगस्ट महिन्यांत देखील नागरिकांना धान्य मिळण्यास अडचणी येत आहे.
यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन धान्य दुकानांमधून या महिन्यात देखील पारंपारिक (ऑफलाइन) पद्धतीने धान्य वितरण करण्यात राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणासाठी ई-पॉस प्रणाली वापरण्यात येते. गेल्या महिन्यात या प्रणालीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे राज्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के धान्य वितरण रखडले होते. त्यावर राज्य शासनाकडून दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मागील महिन्यात घेतली.
नागरिकांना धान्य घेण्यासाठी दररोज चकरा माराव्या लागत आहेत. ई-पॉस मिशन चालत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांचा अंगठा घेत येत नाही, परिणामी धान्य देता येत नाही, असे दुकानदारांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर जुलै महिन्यात पारंपरिक पद्धतीने धान्य वाटप करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती.