Wednesday, December 4, 2024
Homeअध्यात्मस्वामी म्हणतात: झोपताना बोला 'हा' मंत्र : सकाळीच पहा चमत्कार घडेल :...

स्वामी म्हणतात: झोपताना बोला ‘हा’ मंत्र : सकाळीच पहा चमत्कार घडेल : मोठी यशस्वी कामे होतील !

मित्रांनो रात्री झोपताना हा स्वामींचा फक्त एका मिनिटाचा मंत्र म्हणा चमत्कार घडेल आपली मोठी कामे यशस्वी होतील.

तुम्ही- आम्ही सर्वजण रोज विविध कामे करतो. त्यामध्ये अनेक कामांचा समावेश असतो. जसे की आपली काही असेल ती नोकरी, व्यवसाय, शेती, गुरेढोरे पाळणे, मुलांना सांभाळणे, वृद्धांच्या तब्येतीची काळजी घेणे, प्रवास करणे, औषध उपचार पाहणे अशा अनेक  प्रकारांनी आपण दिवसभर कार्यरत असतो.

दिवसभर ही कार्ये आटोपल्यानंतर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वामी म्हणतात की एक दोन सेकंदाचा मंत्र बोला की ज्यामुळे आपली उद्याची कार्ये मार्गी लागतील. यासोबतच घरातील वातावरणही खूप चांगले बनेल.

त्यासाठी केवळ दोन सेकंद म्हणावयाच्या मंत्राची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने हा मंत्र कधी म्हणावा कसा म्हणावा याचीही माहिती आपण घेणार आहोत.

मित्रांनो जेव्हा कधी आपण दिवसभराची सर्व कामे आटपून रात्री झोपी जात असतो तेव्हा आपण दिवसभर केलेल्या कार्य याची मनातल्या मनात उजळणी होत असते. आणि यानंतर आपण झोपी जात असतो.

मात्र काही जणांना झोपच लागत नसते..त्यांना अनेक प्रकारची औषधे घेऊनच झोप येण्याची सवय लागून राहिलेली असते. तर काही जणांना वेगवेगळ्या काळजी असल्यामुळे झोप लागत नसते.

यापैकीच आणखी दुसरे  एक कारण म्हणजे दिवसभरात आपल्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असल्यास किंवा कुठली तरी अडचण आपल्यावर येणार हे माहित झाले असल्यास आपणाला चैन पडत नाही तर रात्री झोप लागत नाही अशा अनेक कारणांमुळे आपली झोप उडालेली असते.

मित्रांनो जर झोपच झाली नसली तर आपली कुठलीच कामे आपल्या हातून सरळ होत नाहीत. यामुळे आपल्याला आपल्या शरीराची मरगळ तर असतेच त्याचबरोबर आपण मानसिक दृष्ट्याही मरगळलेले असतो. यामुळे कुठलेही कार्य करण्यास मन धजावत नाही. कुठल्याच कार्याला उत्साह राहत नाही.

श्री स्वामी समर्थ महाराजांनी केवळ दोन सेकंदांसाठी एक मंत्र सांगितला आहे तो जेव्हा आपण जेव्हा झोपतो त्यावेळी झोप लागण्यापूर्वी आपण जी दिवसभरातील कार्य आठवत असतो.

त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपल्याला झोप तर चांगली लागतेच शिवाय आपली सर्व कार्ये मार्गी ही लागतात. अगदी सोपा मंत्र आहे हा.

हा जो मंत्र आहे तो म्हणजे क्लिम नमः असा आहे. हा मंत्र तीन वेळा झोपताना म्हणावयाचा आहे. सुरुवातीला हा मंत्र म्हणताना आपले हात डोळे कपाळ यावर ठेवून हा मंत्र तीन वेळा म्हणावयाचा आहे क्लिम नमः, क्लिम नमः, क्लिम नमः असे म्हणावयाचे आहे.

त्यानंतर या मंत्राचा जप पुन्हा एकदा तीन वेळा हृदयावर हात ठेवून करावयाचा आहे. आणि शेवटी आणखी एकदा असाच हा मंत्र पुन्हा एकदा तीन वेळा आपल्या बेंबीवर हात ठेवून म्हणावयाचा आहे.

हा मंत्र आपण रोज म्हटला तरी चालेल या मंत्रामुळे आपणाला चांगली झोप लागेल. वाईट स्वप्ने पडणार नाहीत. याचबरोबर आपली सर्व कार्य मार्गी लागतील.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या स्वामी समर्थांच्या माहिती कोषातील चांगली माहिती मिळविण्यासाठी  आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -