Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणीला दीड हजारांसोबत धमकीचा बोनस…संजय राऊत यांचा महायुतीवर हल्लाबोल

लाडक्या बहिणीला दीड हजारांसोबत धमकीचा बोनस…संजय राऊत यांचा महायुतीवर हल्लाबोल

पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात न येणाऱ्या लाडक्या बहिणीला धमक्या देण्यात आली. महायुती सरकार महिलांना दीड हजार रुपयांसोबत धमक्या देत आहे. कार्यक्रमास आले नाही तर पैसे मिळणार नाही म्हणजे दीड हजार आणि धमकीचा बोनस आहे, असा हा प्रकार आहे, असा हल्ला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला आहे.

 

हा सर्व्हे फसवा

राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळत नाही, असा सर्व्हे आला आहे? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी १८० जागा जिंकणार आहे. दिशाभूल करण्यासाठी सर्व्हे येत आहेत. लोकसभेत मोदींना ३५० जागा मिळणार असे सर्व्हे आले होते. हा सर्व्हे म्हणजे ब्रम्ह्यदेवाचा सर्व्हे आहे का? महाराष्ट्रात लोकसभेत त्यांना ४० जागा दाखवल्या होत्या. परंतु किती मिळाल्या? या सर्व्हेवर विश्वास ठेऊ नका. हे सर्व्हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे.

 

चार राज्याच्या निवडणुका एकत्र का नाही?

चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाही. कारण त्यांना झारखंडमध्ये गोंधळ करायचे आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात सरकारची तिजोरी रिकामी करायचे आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारत आहे, परंतु चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेत येत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 

विदर्भात तीन जागा लढवणार

लोकसभेत रामटेक आणि अमरावतीची आमची जागा काँग्रेसला दिली होती. परंतु आता विदर्भातून शिवसेनेचे अस्तित्व विधानसभेत हवे आहे. यामुळे आम्ही तीन जागा लढवू. नागपूरमधील एक जागा आम्ही घेणार आहोत. रामटेक आमचा हक्काचा मतदार संघ आहे. त्यावर शिवसेना उबाठाचा उमेदवार असणार आहे. तसे आणखी एक मतदार संघ घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -