Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशवर्षाअखेरीस बाजारात येईल 5000 रुपयांची नोट, केंद्रीय बँकेने केली मोठी घोषणा

वर्षाअखेरीस बाजारात येईल 5000 रुपयांची नोट, केंद्रीय बँकेने केली मोठी घोषणा

केंद्रीय बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन नोटेचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी होलोग्राम आणि इतर आवश्यक गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठीचे डिझाईन पण तयार करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात ही नवीन नोट बाजारात दाखल होईल

 

केंद्रीय बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन नोटेचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी होलोग्राम आणि इतर आवश्यक गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठीचे डिझाईन पण तयार करण्यात आले आहे. अर्थात ही अपडेट आपला शेजारील पाकिस्तानमधून आलेली आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पाऊल टाकत आहे. जागितक बँकेसह अनेक देशांकडे पाकिस्तानने कर्जासाठी उंबरठे झिजवले आहेत. आता पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन पॉलिमर प्लास्टिक नोट बाजारात येईल.

 

गव्हर्नरने दिली माहिती

 

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी ही माहिती दिली. इस्लामाबाद येथे बँकिंग आणि अर्थविषयक सिनेट समितीच्या बैठकीत याविषयीची माहिती दिली. त्यानुसार या वर्षात डिसेंबरपर्यंत सध्याच्या सर्व कागदी चलन नोटा सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा डिझाईन तयार करण्यात येणार आहे. 10, 50, 100, 500, 1000 आणि 5000 रुपये मूल्याच्या नवीन नोटा डिसेंबमध्ये बाजारात दाखल होतील, असे अहमद यांनी जाहीर केले.

 

सुरुवातीला केवळ चाचणी

 

मिडिया वृत्तानुसार, जुन्या नोटा या येत्या पाच वर्षांपर्यंत चलनात असतील. केंद्रीय बँक यानंतर त्यांना बाजारातून काढून घेईल. सध्या केवळ एका नोटेचा प्रयोग करण्यात येईल. या नोटांना बाजारात जनतेने चांगला प्रतिसाद दिला तर इतर मूल्याच्या नोटा पण बाजारात आणण्यात येतील, अशी माहिती अहमद यांनी दिली. या प्लास्टिक नोटांना जनता कसा प्रतिसाद देईल, याची उत्सुकता आहे.

 

पहिल्यांदा केली या देशाने सुरुवात

 

सध्या जवळपास 40 देश पॉलीमर प्लास्टिक बँकेच्या नोटांचा उपयोग करतात. त्यांची हुबेहुब कॉपी करणे अवघड आहे. होलोग्रॅम आणि पारदर्शकपणा यामुळे नकली नोटा बाजारात येण्यास मोठा अटकाव होतो. ऑस्ट्रेलियामध्ये 1998 मध्ये पहिल्यांदा पॉलिमार नोटा सुरु करण्यात आल्या होत्या. 5,000 रुपयांची नोट बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे अहमद यांनी स्पष्ट केले आहे. जुन्या नोटा या येत्या पाच वर्षांपर्यंत चलनात असतील. केंद्रीय बँक यानंतर त्यांना बाजारातून काढून घेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -