Thursday, September 19, 2024
Homeनोकरीयूनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी; ५०० पदांसाठी सुरु आहे...

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी; ५०० पदांसाठी सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे. अप्रेंटिस पदासाठी एकूण ५०० जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला लिंक दिसेल त्यावर क्लिक करुन फॉर्म भरायचा आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असावे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

 

निवड कशी केली जाणार?

 

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना १०० गुणांची एक परीक्षा घेण्यात येईल. या परिक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांनी मेडिकल परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

अर्ज कसा करायचा?

 

सर्वप्रथम उमेदवाराला यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच unionbankofindia.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.

 

यानंतर होमपेजवर रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करा.

 

यानंतर उमेदवारांनी आपली माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागेल.

 

यानंतर अर्ज शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करावा लागेल.

 

यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -