Monday, September 16, 2024
Homeकोल्हापूरवांगी, बटाटा, कांदा, हिरवी मिरचीचा दर वाढला की कमी झाला, जाणून घ्या...

वांगी, बटाटा, कांदा, हिरवी मिरचीचा दर वाढला की कमी झाला, जाणून घ्या एका क्लिकवर

कोल्हापुरात मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला बाजारात काही अंशी चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यात फळभाज्यांचे दर ४० रुपये किलोपर्यंत खाली आले; तर इंदुरी बटाटा ४५ रुपये किलोपर्यंत गेला.

 

हेळवी कांदा ३५ रुपये किलो होता, तो आता ५० रुपये किलोने विक्री सुरू आहे.

 

लसूण दर ८० ते ९० रुपये पाव किलो असा वधारला आहे. दोन ते तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू झाल्याने कोथिंबीर आणि मेथीची पेंडी २० रुपयांपर्यंत गेली असून शेपू आणि पोकळा मात्र १० रुपयांवर स्थिरावला आहे. श्रावण सुरू असल्याने केळीची पाने, आळूची पाने यांची वाढती मागणी कायम आहे.

 

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो दर रुपयांत)

 

हेळवी कांदा ५०, बटाटा ४५, हिरवी पापडी शेंग ४०, सिमला मिरची ४०, पिकॅडो मिरची ४०, हिरवी मिरची ४०, हिरवी वांगी ४०, जांभळी वांगे ३०, टोमॅटो २०, बिनीस ४०, वाल शेंग ३०, पडवळ ४०, भेंडी ४०, तोंदली ४०, श्रावण घेवडा ४० ते ५०, बेळगावी गाजर ३० ते ४०, उसावरील शेंग ४०.

 

पालेभाज्यांचे दर (प्रति पेंडी रुपयांत)

 

कोथिंबीर २०, मेथी २०, शेपू १०, पालक १०, पोकळा १०, तांदळी १०,कांदापात २०.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -