मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या (govt)विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली आणि ‘लाडकी बहिणी’ योजनेबाबत महत्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ‘लाडकी बहिणी’ योजनेअंतर्गत राज्यात एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ‘मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सरकार करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे.’
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘लाडकी बहिणी’ योजनेमुळे एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ झाला आहे. यासोबतच ‘लाडका भाऊ’ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू केली आहे, ज्यात मुलांना स्टायपेंड देऊन कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, सरकारची भूमिका आरक्षण कमी करण्याची नाही. मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले असून, ओबीसीसारख्या सवलती देखील प्रदान केल्या जातील. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.