Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रसणासुदीत सोने-चांदीची काय वार्ता, सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी किंमती वाढणार?

सणासुदीत सोने-चांदीची काय वार्ता, सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी किंमती वाढणार?

ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीने सुरुवातीला चांगलीच धावा धाव केली. पण नंतर या दोन्ही मौल्यवान धातूला धाप लागली. दोन आठवड्यात एक दोन वेळा किंमतीत वाढ झाली. त्यानंतर दोन्ही धातूत घसरण दिसली अथवा भाव जैसे थे होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात किंमतीत चढउतार दिसला. आता सप्टेंबर महिन्यापासून दिवाळीपर्यंत एका पाठोपाठ सण येतील.

या सणावाराच्या काळात दोन्ही धातूच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सणासुदीला भाव वधारतो, हे बाजाराचं समीकरणच आहे. त्यातच अमेरिकन फेडरल बँकेने अनेक दिवसानंतर व्याजदरात कपातीचा संकेत दिले आहे. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिलेल्या संकेतानुसार, व्याजदरात 1 टक्क्यांची कपात दिसेल. परिणामी दोन्ही धातूचा भाव वाढण्याची शक्यता आहे. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत?

 

सोन्यात आली नरमाई

 

या आठवड्यात एकदाच 28 ऑगस्ट रोजी सोने महागले. या दिवशी सोने 210 रुपयांनी वधारले. त्यानंतर सोन्यात इतर दिवशी किंचित घसरण झाली. अथवा भाव स्थिर होता. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी आणि सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी रविवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रातील भाव अपडेट झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीची काय अपडेट

 

चांदीत या आठवड्यात 27 ऑगस्ट रोजी 600 रुपयांची दरवाढ झाली होती. तर 26 आणि 30 ऑगस्ट रोजी 600 रुपयांची घसरण झाली. इतर दिवशी भावात कोणताच बदल झाला नाही. 1 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात भावात कोणताच बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,958, 23 कॅरेट 71,670, 22 कॅरेट सोने 65,914 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,969 रुपये, 14 कॅरेट सोने 42,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,019 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

घरबसल्या जाणून घ्या भाव

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -