Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगमहिन्याच्या सुरुवातीला स्वस्ताईची वार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

महिन्याच्या सुरुवातीला स्वस्ताईची वार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहे. त्यातच जगात दोन-तीन आघाड्यांवर युद्ध सुरु आहे. देशात आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे बेशकिंमती धातूत उसळीची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या किंमती उतरल्या आहेत. काय आहेत आता सोने आणि चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 3 September 2024 )

 

सोन्यात नरमाईचे सत्र

 

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरणीचे संकेत आहेत. दोन आठवड्यापासून किंमतीत मोठी उलाढाल दिसली नाही. 30, 31 सप्टेंबर रोजी किंमतीत अनुक्रमे 100,110 रुपयांची घसरण झाली होती. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. तर 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीत 2500 रुपयांची घसरण

 

चांदीत 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मिळून 1500 रुपयांची घसरण दिसली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी चांदीत 1 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,900 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,511, 23 कॅरेट 71,225, 22 कॅरेट सोने 65,504 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,633 रुपये, 14 कॅरेट सोने 41,834 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 82,780 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -