इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक जिल्हापोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ.प्रकाश आवाडेंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी रस्त्यावरील खड्डे मुजवा,विद्युत तारांच्या उंचीचा अडथळा दूर करा,विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला उशिरापर्यत परवानगी द्या,मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात अशा विविध मागण्या उपस्थित मान्यवराणी केल्या.
सुरवातीला उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये सार्वजनिक मंडळाची संख्या १हजार असुन त्यानुसार विसर्जन मार्ग घाट व खणीची पाहणी केली आहे.डॉल्बी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ५२ मंडळांवर मागीलवर्षी खटले दाखल केले आहेत.यावर्षी सर्वानी नियमाचे पालन करून खटले दाखल करण्याचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन केले. इचलकरंजी शहरासाठी बंदोबस्त १ अप्पर पोलीस अधीक्षक,१ उपविभागीय पोलीस अधिकारी,१५ पोलीस अधिकारी,२०० अंमलदार,व ७ स्ट्रायकिंग फोर्स असा आहे.
यावेळी विकास चौगुले यांनी रस्त्यावरील खड्डे मुजवण्याची मागणी केली तर हेमंत वरुटे यांनी महावितरणच्या कामाचे कौतुक केले मागील वर्षी मिरवणुका शिवतीर्थ येथे रखडल्याने ध्वनीप्रदूषण झाल्याची बाब निदर्शनास आणली.निर्मला मोरे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.पंढरीनाथ ठाणेकर यांनी मिरवणुकीत तसेच मांडवात देशभक्तीपर गीते,पोवाडे लावावीत व डॉल्बीची मर्यादा ओलांडू नका असे आवाहन केले.सलीम अत्तार व अहमद मुजावर यांनी जातीय सलोखा टिकवून सण साजरा करण्याचे आवाहन केले.मनसेचे शहाजी भोसले यांनी डॉल्बीची वेळ वाढवून मिळावी अशी तर शेखर शहा यांनी मिरवणुकीत गांधी पुतळा ते नदीवेस येथे वीजपुरवठा खंडित होतो,कागवाडे मळा ते डीवायएसपी ऑफिस येथे झाडाच्या फांद्या छाटण्याची मागणी केली तसेच मिरवणूक मार्ग २ दिवस आधी प्रसिद्ध करण्याची मागणी केली.
बाळासाहेब कलागते यांनी बंच वायरचे काम पूर्ण करावे व खड्डे काँक्रिट ने भरायची मागणी केली.मनसेचे रवी गोंदकर यांनी शहरातील सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी केली.भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी आगोदर आगमन होणाऱ्या मंडळाना मिरवणूक परवानगी द्यावी अशी मागणी केली.उमाकांत दाभोळे यांनी विसर्जन कुंड नियोजनाबाबत आयुक्तांचे कौतुक करत बंच वायरचे काम शहरातील सर्व भागात करण्याची मागणी केली.संतोष सावंत व राजु बोंद्रे यांनी रस्त्याची चाळण झाली असून याबाबत मक्तेदारांची चौकशी करावी व दर्जेदार पॅचवर्क करावे अशी मागणी केली.नंदा साळुंखे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यानंतर प्रशासनाच्या वतीने बोलताना महावितरणचे प्रशांत राठी यांनी महावितरणकडून मंडळाना सहकार्य असेल मागील वर्षी आमदारांनी दिलेल्या फंडातून बरीच कामे झाली आहेत तर उर्वरित प्रगतीपथावर आहेत.ती गणेशोत्सव आगमनापूर्वी करून घेऊ तसेच केंद्र सरकारच्या योजनेतून ४५ किमी लाईन बदलण्यासाठी फंड मंजुर असुन ते ही काम प्रगतीपथावर आहे.मंडळांना सुरक्षा ठेव फायनल बिल झाल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाणार आहे.
प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी प्रत्येक मंडळाने अग्निशमनासाठी छोटे उपकरण ठेवावेत,शासनाने दिलेले परवाने दर्शनी भागात लाऊन ठेवावेत जेणेकरून पथक तपासण्यास येतील तेव्हा त्याना सहकार्य करावे,बऱ्याच ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसताना रस्ता व्यापणारे मांडव घातले असून रुग्णवाहिका जावी इतकी जागा सोडुन मांडव घालावेत तसेच डॉल्बीच्या आवाजाचा लहान मुले,वृद्ध,आजारी रुग्ण,गर्भवती महिला यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
आयुक्त दिवटे यांनी रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी पावसाचा अडथळा येत असून जास्त मनुष्यबळ वापरून ते काम पुर्ण करण्यात येईल असे सांगितले. आ.प्रकाश आवाडे यांनी सण मोठ्या आनंदात,उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करायचा असून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रस्त्यांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातून रस्त्याची डागडुजी त्वरित करावी.शहरातील सिसिटीव्हीचा मुद्दा मांडला असता त्यासाठी १२ लाख रुपये खर्च असल्याची माहिती डीवायएसपीनी दिली.तातडीने १२ लाख रुपये देत असुन सीसीटीव्ही सुरू करून घेण्याचे आदेश दिले.महावितरणला २ वर्षात ७५ लाख रुपये दिले असुन पुढील वर्षी बंच वायरचा प्रश्न निकालात निघेल.कुठेही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी त्याचे शूटिंग पोलीस प्रशासनास द्यावे त्यावर कारवाई केली जाईल व जागरूक नागरिकांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगितले.५ सप्टेंबरला यशोदा पुलाचे उद्घाटन करत असून पुल वाहतुकीस खुला होईल ,जुन्या पुलावर असणारे लोखंडी रेलिंग खराब झाले आहेत ते लगेच बदलूम घेण्याची सुचना आयुक्तांना केली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हापोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी १२ लाख रुपये सिसीटीव्ही साठी जाहीर केल्याबद्दल आमदारांचे आभार मानले तर दान केलेल्या मूर्त्या विधिव्रत विसर्जन केल्या जातील.मोठ्या मंडळांनी आगोदर आणलेल्या मूर्त्या चौकात ठेवून जाऊ नये तेथे आपले कार्यकर्ते ठेवावेत तसेच मांडवात ही २४ तास एखादा कार्यकर्ता असावा असे आवाहन केले.मंडळांनी प्रत्येकी २ सीसीटीव्ही विकत घ्यावेत ज्यांना शक्य नसेल त्यांनी भाड्याने घेऊन लावावेत व गर्दीच्या वेळी दागिने व मोबाईलचोरी पासून महिला व नागरिकांचे नुकसान रोखण्यासाठी प्रयत्न करावेत,डॉल्बीचा ७५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करावी लागणार असुन तो प्रसंग टाळावा असे आवाहन केले.गर्दी होणाऱ्या मंडळांनी स्त्री,पुरुष वेगळी व्यवस्था करावी, पार्किंग ची सोय करावी,मिरवणुकीत डॉल्बी व जनरेटर वाहनाच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी,कोठेही अनुचित प्रकार घडल्यास ११२ वर संपर्क करावा तातडीने कारवाई केली जाईल,मंडळांनी रक्तदान शिबिर,आरोग्यतपासणी,शालेय साहित्य वाटप असे विधायक उपक्रम राबवावेत असे महत्वाचे मुद्दे मांडले.आगोदरच्या आगमन मिरवणुकांना परवानगी दिली जाईल तसेच जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने ७,१२,१५,१६,१७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यत डॉल्बीला व स्पीकरला सुट देण्यात आली आहे त्यादिवशी देखावे उशिरापर्यत सुरू राहतील. गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रभारी अधिकारी प्रविण खानापुरे,सचिन पाटील,सचिन सुर्यवंशी,प्रशांत निशाणदार,उपायुक्त प्रसाद काटकर,सोमनाथ आढाव,अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.आभार अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले.