Thursday, September 19, 2024
Homeराजकीय घडामोडी4 दिवसांचा दौरा, भेटीगाठी अन् बरंच काही…; शरद पवारांकडून कोल्हापुरातील ‘त्या’ नेत्यांचं...

4 दिवसांचा दौरा, भेटीगाठी अन् बरंच काही…; शरद पवारांकडून कोल्हापुरातील ‘त्या’ नेत्यांचं तिकीट जाहीर

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मैदानात उतरले आहेत. ठिकठिकाणी शरद पवार दौरा करत आहेत. शरद पवार सध्या चार दिवस कोल्हापुरात आहेत. या दौऱ्यावेळी शरद पवार अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी शरद पवार संवाद साधत आहेत. आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच शरद पवारांची बैठक झाली. महायुतीच्या तीन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

कोल्हापुरातील महायुतीचे नेते पवारांच्या भेटीला

कोल्हापूर दौऱ्या दरम्यान महायुतीच्या तीन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील या अजित पवार गटाच्या नेत्यांशी शरद पवारांची भेट घेतली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली. हे तिन्ही नेते राधानगरीतील भुदरगडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

 

शरद पवारांनी कुणाची उमेदवारी जाहीर केली?

शरद पवारांच्या कौल्हापूर दौऱ्या दरम्यान भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. हसन मुश्रीफ यांचं घर ज्या भागात आहे. त्या गैबी चौकात सभा घेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. लाचारी पत्करल्याचं शरद पवार यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. तर समरजित घाटगे हे कागलचे आमदार असतील. इतकंच नव्हे. महाविकास आघाडीत ते वरच्या पदावर काम करतील, असं शरद पवार म्हणाले. पक्षप्रवेशावेळीच शरद पवारांनी समरजित घाटगेंची उमेदवारी जाहीर करून टाकली. घाटगे यांच्या या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी केलेलं भाषण चर्चेत आहे.

 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार चार दिवस कोल्हापुरात आहेत. त्यामुळे या काळात बऱ्याच गाठीभेटी होणार अन् राजकीय चर्चा होणार. या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरात शरद पवार नवी रणनिती आखत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -