नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा मुंबईतील लालबागचा राजा… लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाच्या दरबारी हजेरी लावली. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, आज सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले होते. यावेळी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.
शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाच्या दरबारात जात दर्शन घेतलं होतं. कोरोना काळात रक्तदान शिबीरासाठीही शरद पवार इथे आले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी यंदा पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
रेवती सुळे आणि सदानंद सुळे यांच्यासोबत शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन आज घेतलं आहे. दरम्यान, दुपारी 12 वाजता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत.