महिलांसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या योजना आहेत.त्यातीलच एक योजना म्हणजे सुभ्रदा योजना. सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला १० हजार रुपये दिले जातात.
ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे.या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. महिलांना वर्षाला १० हजार देण्यात येतात. ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेसाठी कोण अर्ज करु शकतात ते जाणून घेऊया.
महिलांना मिळणार १० हजार रुपये
ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना वार्षिक १० हजार रुपये दिले जातात. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. म्हणजेच महिलांना ५०००० रुपयांची मदत केली जाते. सरकार ही रक्कम महिलांच्या खात्यात दोनदा जमा करते.
लाभ कोणाला घेता येईल?
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांनी याआधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.