Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगसोने-चांदीची आगेकूच, किंमती वाढल्या झरझर, उत्सवात आता भाव काय?

सोने-चांदीची आगेकूच, किंमती वाढल्या झरझर, उत्सवात आता भाव काय?

सध्या सणासुदीची धामधूम सुरू आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींनी उंच उडी घेतली आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. गेल्या काही आठवड्यापासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरू होते. बजेटमध्ये सीमा शुल्कात कपात झाल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. ऑगस्टच्या सुरूवातीला दोन्ही धातूच्या किंमती भडकल्या. त्यानंतर त्यात नरमाई आली. गेल्या दोन आठवड्यात किंमती उतरल्या होत्या. या आठवड्यात मरगळ झटकून दोन्ही धातूंनी भरारी घेतली आहे. उत्सवात मौल्यवान धातूंनी दरवाढीची नोंद केली. असा आहे आता सोने आणि चांदीचा भाव

 

गेल्या काही दिवसांची मरगळ झटकून सणासुदीत सोन्याने मोठा टप्पा गाठला. सोमवारी सोन्याचा दर स्थिर होता. तर 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. त्यानंतर बुधवारी सोने 380 रुपयांनी वधारले. तर आज 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दमदार कामगिरी

 

मरगळ झडत चांदीने या आठवड्यात दमदार कामगिरी केली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वधारली. 10 सप्टेंबरला 1 हजारांची वाढ झाली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर सकाळच्या सत्रात 12 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,600 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,994, 23 कॅरेट 71706, 22 कॅरेट सोने 65,947 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,996 रुपये, 14 कॅरेट सोने 42,117 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,407 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -